महत्वाचे सुचना

९८२२४१७८४३/९५९५३०४४६----आता MPSC चा अभ्यास करा online लवकरच

चालु घडामोडी


चालु घडामोडी व इतर सर्व विषय काळजी पुर्वक वाचा आता ही माहीती दररोज अपडेट होत आहे 


    • श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून जीएसएलव्ही-डी 5 चे रविवारी 5 Jan 2014 दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटमध्ये प्रथमच स्वदेशी बनावटीच्या `क्रायोजेनिक’ इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. हे रॉकेट भारताचा दूरसंचार उपग्रह `जीसॅट-14′ला पृथ्वीच्या कक्षेत पोहचविणार आहे.
    • भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जगातील सर्वात उंच ठरेल अशा महाकाय म़ती उभारली जाणार आहे.हे काम 2018 पर्यंत पुर्ण केले जाते.
    •  दिल्ली येथे आप सरकारने 70 जागे पैकी 28 जागेवर आपले वर्चस्व गाजवले.
    • 5 राज्या मध्ये झालेल्या निवडणुका दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरोम येथे पार पडल्या.
    • मध्येप्रदश मुख्यमंत्री - शिवराज चव्हाण सलग तिस-यांदा 

    • "यशवंत पंचायत राज अभियान 2014' 
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त पंचायत राज संस्था
जिल्हा परिषदा (राज्यस्तर)
1. जिल्हा परिषद, लातूर - पहिले पारितोषिक - 25 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
2. जिल्हा परिषद, सांगली- दुसरे पारितोषिक - 15 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
3. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग- तिसरे पारितोषिक - 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
पंचायत समित्या (राज्यस्तर)
1. पंचायत समिती, देवगड, जि. सिंधुदुर्ग - पहिले पारितोषिक- 15 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
2. पंचायत समिती, करवीर, जि. कोल्हापूर- दुसरे पारितोषिक- 12 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
3. तिसरे पारितोषिक विभागून
पंचायत समिती, रेणापूर, जि. लातूर- 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
पंचायत समिती, ब्रह्मपुरी- जि. चंद्रपूर- 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
ग्रामपंचायती (राज्यस्तर)
1. ग्रामपंचायत ठिकेकरवाडी- ता. जुन्नर, जि. पुणे- पहिले पारितोषिक- 7 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
2. ग्रामपंचायत शिवनीमोगरा, ता. लाखनी, जि. भंडारा- दुसरे पारितोषिक- 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
3. ग्रामपंचायत चेनुष्टा, ता. तिवसा, जि. अमरावती- तिसरे पारितोषिक- 3 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त पंचायत राज संस्थांव्यतिरिक्त विभागीय स्तरावर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आलेल्या पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचाही या वेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

    • 16 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेला सचिन भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणारा पहिला खेळाडू ठरला आहे.भारतरत्न पुरस्काराने राव हे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. 1954 पासून आतापर्यंत 41 जणांना "भारतरत्न'ने गौरविण्यात आले आहे.

    • महाराष्ट्राचा अंतिम सामन्यात सात गडी राखून पराभव करत कर्नाटक संघाने सातव्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. चौदा वर्षांनंतर कर्नाटकला रणजी करंडक मिळविण्यात यश आले आहे.
    • जपानच्या ओसाका मोनोरेलनंतर (23.8 किलोमीटर) सर्वाधिक अंतराची ठरणाऱ्या आणि भारतातील पहिल्या मोनोरेलचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवत त्याचे उद्‌घाटन केले. चेंबूर-वडाळा-सात रस्त्याचा संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) या सुमारे 19.17 किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल प्रकल्प उभारला गेला आहे.